स्वस्तिश्री बाल संस्कार वर्ग
प्रवास 'स्व'शोधाचा !!
आपली संस्कृती आणी परंपरा जतन करणे हाच आहे आमचा ध्यास धरा स्वस्तिश्री बालसंस्कार वर्गाची कास होईल आपलया पाल्याचा व्यक्तिमत्व विकास
ऑनलाईन सार्थ श्रीरामरक्षा स्तोत्र पठण वर्ग

नमस्कार मंडळी
आज २१ व्या शतकातील या धावत्या युगात केवळ बौद्धिक विकास होणे म्हणजे शिक्षण नव्हे तर स्वतः चे जीवन ,चारित्र्य घडविण्यासाठी आणि विचारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या शिक्षणाची खरी गरज आहे . म्हणूनच आपल्या कुटुंबातील सतत धावणाऱ्या लहानग्या पावलांना,मनांना थोडी स्थिरता, शांतता सर्जनशीलता आणि सर्वांगीण समृद्धता लाभण्यासाठी घेऊन येत आहोत एक अभिनव उपक्रम
प्रत्येक वयोगटासाठी
आपल्या बाल संस्कार वर्गात मुलांच्या वयोगटाप्रमाणे दोन वेगवेगेळे गट आहेत. वयानुसार बालकांची आकलनशक्ती भिन्न असते तसेच सर्व प्रकारच्या क्षमतांचे देखील विकसनाचे टप्पे असतात. यासाठीच आपल्या वर्गात वयोगट ३ ते ७ वर्षे आणि ८ ते १५ वर्षे असे २ वयोगट आहेत , ज्यामध्ये त्यांच्या वयाला अनुसरून असे सर्व उपक्रम घेतले जातात तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात.
उच्च दर्जाचे शिक्षण
आजच्या या डिजिटल मिडिया च्या युगात आपल्याला आपल्या मुलांना सुसंस्कारित असे भावी सुजाण नागरिक म्हणून घडवायचे असेल तर आत्ता त्यांना उत्तम शिक्षण देणे ही निश्चितच आपली जबाबदारी आहे. दैनंदिन जीवनात शालेय शिक्षण मुले घेतच आहेत पण त्याचबरोबर मुलांना धर्मशिक्षण,आत्मिक विकासासाठी शिक्षण एकूणच काय तर ‘स्व -त्वाचा शोध’घेण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे . मुलांमध्ये असलेल्या कार्यशक्तीला योग्य दिशा देणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच भावी सुजाण भारतीय घडविण्याचे कार्य आम्ही हाती घेतले आहे त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण बालकांना दिले जाते.
आम्ही काय शिकवतो ?
Check out the great services we offer
संस्कृती जतन आणि वाढ
संपूर्ण विश्वाला वंदनीय असणाऱ्या उदात्त भारतीय संस्कृतीचे आपण वारसदार आहोत. सुमारे पाच हजार वर्षे जुनी अशी आपली भारतीय संस्कृती आहे. समृद्ध जीवन जगण्यासाठी आपल्या संस्कृतीतील मूल्ये निश्चितच उपयुक्त आहेत. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक परंपरा सण, उत्सव साजरा करण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत, त्याचे अगणित फायदे आहेत. म्हणूनच आपल्या चिमुकल्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होणे , आपली मूल्ये त्यांच्यामध्ये रुजविणे तसेच त्यांच्या जीवनशैलीत या सर्व बाबी अंगी बाणविणे गरजेचे आहे. आपल्या देशाच्या उज्ज्वल, तेजोमय भविष्यनिर्मितीसाठी सुसंस्कारित बालके घडविणे अगत्याचे आहे. यासाठीच आपल्या बाल संस्कार वर्गात नियमितपणे सर्व सण, उत्सव तसेच सर्व महत्वपूर्ण दिवस साजरे केले जातात. वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे बालक आपल्या समृद्ध संस्कृतीतील छान छान गोष्टींचा आनंद लुटतात.
कार्यसंघ
Our team is always here to help

सौ .निलिमा केदारी
संस्थापिका, संचालिका
सौ . सोनाली नानगुडे
सहाय्यक शिक्षिकाआमचे मार्गदर्शक

प्राचार्या सौ. वीणा खांदोडे - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय, पुणे
आज छोट्याशा कुटुंबात आजी-आजोबा नावाचं संस्कारपीठ, तसेच आई बाबांच्या विरुद्ध तक्रार ऐकून घेणारं सुप्रीम कोर्ट अभावानंच आढळतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात आईवडिलांना मुलांशी संवाद करायला आणि त्यांच्यावर संस्कार करायला इच्छा असूनही वेळ मिळत नाही मग ती मुलं दूरदर्शनवरील कार्टून फिल्म्स, मिकी माऊस, स्पायडरमॅन यांच्या तसेच मोबाईलवर, कॉम्प्युटरवर गेम खेळण्याच्या आहारी जातात. आता तर काय कोरोना महामारी मुळे मुलांना शिक्षणही ऑनलाइन घ्यावे लागले त्यामुळे मोबाईल /लॅपटॉप हेच त्यांचे मित्र झाले दुसरं काय करणार? या पार्श्वभूमीवर निलिमा ताईने बालसंस्कार चा वसा घेतलाय. मुलांनी व त्यांच्या पालकांनी याप्रमाणे आचरण केले तरी संस्कारसंपन्न, सुजाण, सुसंस्कृत, राष्ट्रप्रेमी नागरिक घडण्यास मदत होईल. निलिमाताईला या बालसंस्कार वर्गासाठी खूप खूप शुभेच्छा!!
पालकांच्या प्रतिक्रिया
संपर्क
आजच नोंदणी करा