Crafts image

कला कार्यानुभव

ईश्वराने प्रत्येक व्यक्तीमध्ये कलेचा अंश ठेवलेला आहे, त्याचे स्वरुप जरी प्रत्येकामध्ये वेगवेगळे असले तरी तो अंश आपल्यामध्ये आहे हे ओळखून त्याच्या आविष्काराचा प्रयत्न करणे म्हणजे कलेची उपासना होय. कला शिक्षणाचा मूळ हेतू हा मनासोबतच संपूर्ण जीवनाला योग्य वळण लावणे हा आहे. लहान मुलांच्या मनात दडलेल्या भावभावना, कलागुण यांना वाव देऊन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास करणे हेच आपल्या बाल संस्कार वर्गाचे मुख्य उदिष्ट आहे.

मुलांमध्ये उपजत असलेल्या कलेला ओळखून कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. त्याचप्रमाणे कला आणि कार्यानुभव या विषयांद्वारे मुलांमध्ये सर्जनशीलता नीटनेटकेपणा यांसारखी मूल्ये विकसित होतात. आपल्या 'स्वस्तिश्री' बालसंस्कार वर्गात मुलांच्या वयोगटानुसार अगदी सोप्या पदधतीने विविध उपक्रम घेतले जातात व सर्व विद्यार्थी आनंदाने सक्रियपणे त्यांत सहभागी होतात.