Good Thoughts image

नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही ?
छान आहात ना ! 

तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत परदेशात राहता. तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन आनंदी जीवन जगता. एखादी नववधू जेव्हा आपले माहेर सोडून सासरी येते, तेव्हा सासरच्या वातावरणात, तिथल्या चालीरीती समजून घेऊन तिथे मिसळून जाते, एकरूप होते. परंतू सासरी सौख्याने नांदताना मनाच्या एका कोप-यात माहेराची आठवण, माहेरी जायची ओढ असतेच... त्याचप्रमाणे तुम्ही तिकडे परदेशात जरी असला तरी आपल्या देशाची,महाराष्ट्राची, कुटुंबाची ओढ तुम्हाला नक्कीच वाटत असणार. एका बाजूला आपल्या मायभूमी पासून दूर सुखवस्तू जीवन जगत असतानाच आपल्या हातून काहीतरी निसटतयं, आपली मुले आपल्या संस्कृतीपासून दुरावत आहेत ही खंत तर वाटत नाहीये ना ? त्याचबरोबर आपल्या मराठी कुटुंबात लग्नगाठ बांधून नव्याने प्रवेशलेल्या परदेशी संस्कृतीतील सूनबाई किंवा जावयांस आपल्या सासरच्या मंडळींशी परिचय होण्यासाठी, आपले नात्यांचे ऋणानुबंध अधिक घट्ट होण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधता येणे अगत्याचे ठरते. आपल्या साथीदाराला तसेच मुलांना आपल्या कुटुंबीयांशी,आजी आजोबांशी आणि नातेवाईकांशी, संवाद साधता आला, त्यांना आपले सणवार, संस्कृती आपल्या भाषेद्वारे कळाली तर… किती छान ना? म्हणूनच आपल्या मातीशी, मराठी मनाशी, आपल्या आप्तेष्ट-कुटुंबीयांशी असलेली आपली नाळ आपल्या मातृभाषेद्वारे पुन्हा जोडण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक सुवर्णसंधी. चला तर मग नातं जोडूया आपल्या मातृभूमीशी, आपल्या संस्कृतीशी - Let's Learn Marathi - चला शिकूया मराठी या अभिनव उपक्रमाद्वारे.

या उपक्रमात कोण सहभागी होऊ शकते ?

परदेशी नागरिक

परदेशी नागरिक

परदेशातील नागरिक आणि त्यांची मुले

परराज्यातील नागरिक

परराज्यातील नागरिक

परराज्यात असणारे नागरिक स्वतः किंवा त्यांची मुले

विद्यार्थी

विद्यार्थी

४ वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील विद्यार्थी

पालकांच्या प्रतिक्रिया

About image

Prachi Khose, Houstan USA

My daughters kavya and swara are learning to read, write and speak in Marathi from Nilima since last one year. They are 11 years old and never really spoke in Marathi that much as we live in USA.  Nilima is very passionate and driven for teaching. My daughters have shown Tremendous progress. She knows how to treat children with love and respect and engage them in activities. My daughters love her. She is very organized with her curriculum and work really hard on kids. She is very detail oriented and have superb capabilities of making kids love what they are learning. I am very happy with the progress my kids made, and very pleased that I found Nilima as a teacher for my kids.