Poems image

बालगीते बडबडगीते

लहानग्यांना सर्वात जास्त काही आवडत असेल तर ते म्हणजे गाणे. आपण पाहतो अगदी तान्हे बाळ जेव्हा रडत असते तेव्हा आई गाणे म्हणते तर ते बाळ रडायचे थांबते, एकटक पाहते आणि हसते. म्हणजेच अगदी लहानपणापासूनच बालकांना गाण्याची आवड असते आणि यातूनच बडबडगीत, अंगाई गीते, बालगीते यांची निर्मिती करण्यात आली असावी. 

आपल्या बाल संस्कार वर्गात अशीच भरपूर बडबडगीते, बालगीते आणि वयोगटानुसार समूहगीते, भक्तीगीते यांचा समावेश केला आहे. गाण्यांतून मुलांना छोटे-मोठे अनेक विषय अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या शब्दात समजावून दिले जातात. 

या उपक्रमाद्वारे मुलांची पाठांतर क्षमता तर वाढतेच पण त्याचबरोबर त्यांना तालासुरांचे योग्य ज्ञान होते, स्मरणशक्ती देखील वाढते आणि याच कलात्मक दृष्टीकोनातून मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने आम्ही आपल्या मुलांसाठी अनेकविध बडबडगीते, बालगीते, गाणी यांचा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे.