Stories image

कथा जीवनकथा

एखादया काल्पनिक किंवा वास्तविक प्रसंगाला रोचक, मनोरंजनात्मक पद्धतीने प्रस्तुत केलेल्या वर्णनाला कथा असे म्हणतात. लहान असो किंवा मोठा असो प्रत्येकालाच कथा ऐकायला आवडतात. लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने घरात आजी आजोबा मुलांना गोष्टी सांगतात. आपल्या बालसंस्कार वर्गामध्ये अशाच प्रकारे विविध नैतिक कथा , बोधकथा, प्रेरणादायी जीवनकथा या सर्वांचा समावेश करून मुलांमध्ये विविध मूल्ये आणि संस्कार रुजविण्याच्या प्रयत्न केला आहे. 

कोणताही चांगला विचार किंवा संस्कार मुलांमध्ये रुजविण्याचा कथाकथन हा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. कथाकथनाने आणि कथा-श्रवणाने मुलांमध्ये मुद्देसूद बोलणे, घटना योग्य क्रमाने सांगणे, शब्दांची योग्य जुळवाजुळव करून प्रभावीपणे संवाद साधणे, सारासार विचार करणे आत्मविश्वासाने बोलणे यांसारखी अनेक कौशल्ये आत्मसात केली जातात. या हेतूनेच आपण कथा, जीवनकथा नियमितपणे बालकांना ऐकवितो.